शहापूर-धेरंडला उधाणाचा वेढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर-धेरंडला उधाणाचा वेढा
शहापूर-धेरंडला उधाणाचा वेढा

शहापूर-धेरंडला उधाणाचा वेढा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२३ : अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड ही गावे उधाणाच्या पाण्याने वेढली आहेत. तीन दिवसांपासून उधाणाचे पाणी गावात घुसल्याने २३ घरांचे नुकसान झाले आहे. पण कोणतीही प्रकारच्या उपाययोजना झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे.
अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड या दोन गावातील जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे. मात्र, खाडी किनाऱ्यावरील बांधबंधिस्तीची डागडुजी होत नसल्याने उधाणाचे पाणी सातत्याने गावामध्ये शिरत आहे. एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. या उधाणाची माहिती मिळताच पंडित पाटील यांनी तातडीने धेरंड, शहापूरचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी एमआयडीसी आणि खारलॅन्ड विभाग या समस्येवरून खो-खो खेळत आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच कायमस्वरुपी बंधाऱ्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर असताना खालच्या यंत्रणेने वेळ न दवडता पावसाळ्यापूर्वी बंधारा बांधणे गरजेचे असल्याची मागणी देखील केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जि.प.सदस्या भावना पाटील, सुधीर थळे, सतीश म्हात्रे, अनिल म्हात्रे, अ‍ॅड. कुंदन पाटील, राजेंद्र पाटील, अजित पाटील, मंगेश पाटील, नीलम पाटील आदी उपस्थित होते.
़़़ः---------------------------------------
या समस्येवर सरकारने आता कायमस्वरुपी तोडगा काढावा. पावसाळ्यापूर्वी जर बंधारा बांधला नाही तर येथील रहिवाशांचे कायमस्वरुपी स्थलांतर करावे लागेल. तसेच चालढकल न करता पावसाळ्यापूर्वी या समस्येवर तोडगा काढावा.
-पंडित पाटील, माजी आमदार, शेकाप