Sat, June 3, 2023

अंबानदीत बुडून तरुणाचा मृत्यू
अंबानदीत बुडून तरुणाचा मृत्यू
Published on : 23 February 2023, 11:40 am
पाली (वार्ताहर)ः अंबा नदीत बुडून येथील भोईआळीतील तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरेश शिंदे (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे. नरेश शिंदे तीन दिवसांपासून कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. तिसऱ्या दिवशी त्याचे शव अंबा नदी पात्रात सापडले आहे. पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे. पाली पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.