रस्सीमध्ये अडकलेल्या मगरीला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्सीमध्ये अडकलेल्या मगरीला जीवदान
रस्सीमध्ये अडकलेल्या मगरीला जीवदान

रस्सीमध्ये अडकलेल्या मगरीला जीवदान

sakal_logo
By

पाली, ता. २४ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील इंदापूर गावाजवळील नगरोली येथील एका ओढ्यात आठ फुटी मगर नायलॉनच्या जाळीमध्ये गुरुवारी (ता. २३) अडकली होती. या मगरीला वन्यजीव संरक्षक पथकाने वन विभागाच्या मदतीने शिताफीने पकडून सुरक्षित अधिवासात सोडून दिले.

मुंबई-गोवा महामार्गानजीकच्या ओढ्यात जाळ्यात एक मगर अडकलेली अजय मोरे यांना दिसली होती. त्यांनी कोलाड येथील वन्यजीव संरक्षक सागर दहिंबेकर यांना संपर्क साधला. पथकाला घेऊन ते घटनास्थळी पोहोचत मगरीची सुटका करण्याआधी स्थानिक वन विभाग कार्यालयाला संपर्क केला. इंदापूर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सागर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या मदतीने अर्ध्या तासांच्या परिश्रमानंतर मगरीची सुटका केली. त्यानंतर वन विभागाच्या मदतीने मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यासाठी सागर दहिंबेकर, नीलेश लोखंडे, सूरज दहीवडेकर, श्वेता विश्वकर्मा, संदेश यादव, नीरज म्हात्रे, सचिन सानप आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

परिसरातील काळ नदीमध्ये मगरी आढळतात. पावसाळ्यात नदीला खूप पाणी आल्यावर मोठ्या मगरी बाहेर पडतात व आजूबाजूच्या ओढे, नाल्यांकडे स्थलांतरित होतात. येथील पाणी कमी झाल्यावर पुन्हा नदीकडे मार्गक्रमण करतात. या मगरीच्या बाबतीतसुद्धा असेट झाले असावे.
- सागर दहिंबेकर, वन्यजीव संरक्षक, कोलाड