विज्ञान मेळाव्यात गुंतले बालवैज्ञानिक

विज्ञान मेळाव्यात गुंतले बालवैज्ञानिक

पाली, वार्ताहर
विज्ञान दिनाचे औचित्य साधून नेणवली शाळेमध्ये नुकतेच गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते. यानिमित्त पहिली ते पाचवी आणि सहावी ते सातवी या दोन गटांमध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रम राबवण्यात आले.
नेणवली येथे नावीन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा असल्याने येथील प्रयोग परिसरातील सर्व विद्यार्थी, नागरिकांना पाहता यावेत, यासाठी विज्ञान मेळा भरवण्यात आला होता. या वेळी पहिली ते पाचवीसाठी आपली पृथ्वी आणि माझ्या परिसरातील माझे दोस्त सोबती या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर सहावी-सातवीसाठी वैज्ञानिक रांगोळी व निबंध लेखन स्पर्धा झाली. त्यासाठी स्वयंपाकघरातील विज्ञान, विज्ञानातील संकल्पना, माझी शाश्वत जीवनशैली अशा प्रकारचे विषय त्यांना देण्यात आले होते. याचबरोबर तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान पाठ्यपुस्तकअंतर्गत छोटे प्रयोग व कृती घरगुती व टाकाऊ साहित्य वापरून हे प्रयोग सादरीकरण केले. यातूनच विज्ञाननिष्ठा जपली. विज्ञानदिनी शाळा व्यवस्थापन समिती नेणवलीने आजच्या या मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेणवली शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल; तसेच उपशिक्षक राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे, श्रीहरी धुळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिन यशस्वीरित्या वैज्ञानिकरित्या झाला.

पाली : विज्ञान दिनानिमित्त आयोजित उपक्रमात विद्यार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com