
कबड्डी चषकाचा कर्जतसंघ विजेता
अलिबाग, ता. १४ : तालुक्यातील नवयुवक क्रीडा मंडळ खिडकी आयोजित वैभव पाटील पुरस्कृत सरपंच चषक जिल्हास्तरिय भव्य कबड्डी स्पर्धेत मिडलाईन कर्जत संघ विजेता ठरला.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ३२ नामवंत संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा नवयुवक क्रीडा मंडळ खिडकी येथे तीन मैदानात मोठ्या दिमाखात झाली. स्पर्धेत उपविजेता मातृछाया कुर्डुस आणि तृतीय क्रमांक विनायक दिवलांग, चतुर्थ जय हनुमान की कोपर हा संघ विजेता ठरला. ही भव्य स्पर्धा पाहण्यासाठी २५ हजारांहून अधिक क्रीडा रसिक आणि महिला वर्ग उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अनेक मान्यवरांनी वैभव पाटील, आल्हाद पाटील व नवयुवक क्रीडा मंडळाचे कौतुक केले. याप्रसंगी खरिपाट विभाग काँग्रेस अध्यक्ष वैभव पाटील, खिडकी सरपंच उज्ज्वला पाटील, स्वागताध्यक्ष आल्हाद पाटील, अरविंद पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, हितेंद्र पाटील, ज्येष्ठ पंच प्रसन्न पाटील, चेतन पाटील, व्ही. पाटील, धरमदास पाटील, जी. एस. पाटील, सीताराम पाटील, प्रतीक पाटील, धीरज पाटील, दर्शन पाटील, हर्षल पाटील, दामोदर पाटील, कल्पेश पाटील उपस्थित होते.