साताड बंदरात बैलगाडीचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साताड बंदरात बैलगाडीचा थरार
साताड बंदरात बैलगाडीचा थरार

साताड बंदरात बैलगाडीचा थरार

sakal_logo
By

अलिबाग, ता. २३ : नागाव साताड बंदर (माती बंदर) येथे गुढीपाडव्यानिमित्त बैलगाडी, घोडागाडी स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात शेकडो बैलगाड्या सहभागी झाल्‍या होत्‍या. स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी साताड बंदरावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
स्पर्धेचे आयोजन सचिन राऊळ व राकेश राणे यांनी स्‍पर्धा आयोजित केली होती. या वेळी नागाव सरपंच निखिल मयेकर, राहुल पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र म्हात्रे, अमीर ठाकूर आदी उपस्थित होते. स्पर्धा २२ गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात १० त १५ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत स्पर्धा सुरू होती.
अलिबाग ः