जनतेच्या समस्यांच्‍या निवारणाला प्राधान्‍य

जनतेच्या समस्यांच्‍या निवारणाला प्राधान्‍य

पाली, ता. २३ (वार्ताहर) ः आम आदमी पार्टीच्या सुधागड तालुक्‍यातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन पालीमध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज घरत यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी उघडण्यात आल्‍याचे प्रतिपादन आपचे सुधागड तालुकाध्यक्ष अशोक रायकर यांनी केले.
सरकारकडून अधिकृत असलेल्या परंतु रखडलेल्या योजना, उपक्रम यांचा लाभ मिळवून देण्यासाठी संपूर्ण कार्यकारणीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. वीज, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण या प्राथमिक व मूलभूत नागरी सेवा सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्‍याचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे यांनी आश्‍वासित केले. कार्यालयाच्या उद्‌घाटन उद्घाटन प्रसंगी जिल्हा कमिटी सदस्य राजेंद्र वाघ, डॉ. रियाज पठाण, डॉ. शेखर जांभळे, जहीर शेख, विवेक वाघमारे, इरफान शेख, श्रद्धा बामणे व सुधागड तालुका कार्यकारणीतील सदस्य दीप्ती दळवी, यशोदा जगताप, फैसल महाडकर, अल्ताफ पानसरे, तौहिद भाई पठाण, शोएब मणियार, आदी मान्यवर उपस्थित होते.
पाली ः आम आदमी पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com