जिल्हा रुग्णालय विशेषज्ञ डॉक्टरांविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा रुग्णालय विशेषज्ञ डॉक्टरांविना
जिल्हा रुग्णालय विशेषज्ञ डॉक्टरांविना

जिल्हा रुग्णालय विशेषज्ञ डॉक्टरांविना

sakal_logo
By

अलिबाग, ता. २६ (बातमीदार) ः महिलेच्या गर्भातील अर्भक गर्भातच मृत पावल्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे असतानाही अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टरच नसल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याची तक्रार नागरिक करत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी याबाबत गांभिर्याने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातील दुष्मीखार पाडा येथील आदिवासी वाडीतील आठ महिन्याच्या गरोदर महिलेवर पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. अधिक उपचारासाठी तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात बुधवारी रोजी (ता.२२) दाखल करण्यात आले. सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या गर्भातील अर्भक मृत पावल्याचे आढळून आले. त्यामुळे महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. पण, तिथे स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याचे कारण सांगून रुग्णालयाने रुग्णाला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. महिले गर्भात मृत अर्भक असल्याने तिच्या जीवालाही धोका उद्भवण्याची शक्यता होती. पण, रुग्णालयाने सरळ हात वर केले. जिल्हा रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टर नसणे ही गंभीर बाबर असून याकडे जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.