बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा
बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा

sakal_logo
By

पाली, ता. ९ (वार्ताहर) ः संकष्टी चतुर्थीला रविवारी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.
परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. मंदिर परिसराला जत्रेचे स्‍वरूप आले होते. फळे, ओले काजूगर, कंदमुळे व रानमेवा विक्रीसाठी आलेल्‍या महिलांकडून भक्‍त आवर्जून खरेदी करताना दिसले. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाक्यावर वाहतूक पोलिस तैनात होते. अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरून दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांकडून नियमांचे व रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्‍याने वाहतूक कोंडीत भर पडली. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत.