अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा
अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा

अंगणवाडी सेविकांसाठी कार्यशाळा

sakal_logo
By

अलिबाग, ता. २९ : दी लाईफ फाऊंडेशनतर्फे मंगळवारी (ता. २५) अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांसाठी जिल्हा परिषद शाळा वरसोली येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छता, तसेच बालसंगोपन योजनेविषयी चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच बाललैंगिक शोषण आणि बाल हक्क याविषयी सेविका आणि पालकांची भूमिका काय असावी, बाल लैंगिक शोषणाच्या घटना आढळल्यास बाल कल्याण समितीला संपर्क करावा, याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अंगणवाडीसेविकांनी शंका विचारून त्यांचे समाधान मिळवले. या कार्यशाळेचा उद्देश अंगणवाडीसेविकांनी आपल्या अंगणवाडीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करून किशोरी मुलींना आणि महिलांना वरील विषयांवर मार्गदर्शन करणे हा आहे. या कार्यशाळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, तसेच पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, उल्का कुलकर्णी, विनोदिनी मोकल, दिप्ती मोकल यांच्यासह अंगणवाडीसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते शिलानंद इंगळे, पूर्णिमा ढोबळे , मुस्कान शेख, प्रणय ओव्हाळ आणि राखी राणे यांनी परिश्रम घेतले.