Sun, Sept 24, 2023

वावळोली गावात विकासकामांना सुरुवात
वावळोली गावात विकासकामांना सुरुवात
Published on : 4 May 2023, 1:01 am
पाली (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील वावळोली गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. ४) भाजप राज्य कार्यकारणी सदस्य राजेश मपारा यांच्या हस्ते करण्यात आले. विकास कामांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, वावळोली गावातील मुख्य रस्ता, गणपती विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता व नाल्यावरील बंधारा या कामांचा समावेश आहे. येथील पाणीपुरवठा योजना लागणार मार्गी लागल्यावर पाणी प्रश्न मिटणार आहे. शिवाय इतर विकासकामांमुळे गावातील ग्रामस्थांची गैरसोय थांबणार आहे. या वेळी भाजप सुधागड तालुका सरचिटणीस शिरीष सकपाळ, ताराबाई सकपाळ, नीलेश शिर्के, पोलिस पाटील महाले, शरद किंजावडे उपस्थित होते.