रेवदंडा मोठे बंदरात बेकायदा व्यवसाय

रेवदंडा मोठे बंदरात बेकायदा व्यवसाय

सकाळ वृत्तसेवा
रेवदंडा, ता. २९ (बातमीदार) : इतिहासकालीन रेवदंड्याच्या मोठे बंदर परिसराचा ताबा काही व्यक्तींनी घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी जमिनीवर बेकायदा पद्धतीने तंबू ठोकून पर्यटन व्यवसाय सुरू आहे. याचा परिणाम प्रामाणिकपणे पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर होत आहे. अशा बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी मोठे बंदरातील नागरिकांनी रायगड जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, रेवदंडा बंदर निरीक्षकांना ग्रामपंचायतीने पत्र देत कारवाईबाबतचा अहवाल मागितला आहे.
रेवदंडा येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटन हे रेवदंडा परिसरातील रोजगाराचे मुख्य साधन आहे. आज या व्यवसायात येथील नागरिकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले असतानाही त्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत सरकारच्या कोट्यवधी किमतीच्या जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदा ताबा मिळवून पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. मोठे बंदरात या व्यक्तींनी ठोकलेल्या तंबूमध्ये पर्यटकांना निवासाची सुविधा केली जाते. तेथे अनधिकृत प्रकारही चालत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या आहेत.
रेवदंडा परिसरातील जमिनीचे भाव गगनाला टेकलेले असताना इतिहासकालीन मोठे बंदरातील जागेवर भूमाफियांनी ताबा मिळवत बेकायदा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. यासाठी या अनधिकृत पर्यटन व्यवसायिकांवर कारवाई करावी, अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे मोठे बंदरावरील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी-रायगड, स्थानिक तहसीलदार, ग्रामपंचायत कार्यालय, मेरिटाईम बोर्ड आदींकडे केली आहे.

ध्वनिप्रदूषणाचा त्रास
मोठे बंदरावर समुद्रकिनारा असलेल्या सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामाला ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिलेली नाही. सरकारी जागेत बेकायदा (टेंन्ट) पर्यटन व्यवसाय सुरू आहे. येथील नागरिकांना त्या व्यवसायाचा त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी डी.जे. लावला जात असल्याने नागरिकांना ध्वनिप्रदूषण समस्येलाही सामोरे जावे लागत आहे.

अनधिकृत विनापरवाना टेंट व्यवसाय करत असलेल्यांवर परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची ही जागा असल्याने, काय कारवाई केली गेली. याबाबत ग्रामपंचायतीला अहवाल सादर करावा, असे पत्र रेवदंडा बंदर निरीक्षकांना देण्यात आले आहे.
- प्रदीप दिवकर, रेवदंडा ग्रामविकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com