शासकीय कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे धडे

शासकीय कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे धडे
Published on

अलिबाग, ता. २१: आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत जनजागृतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) सहभागाने विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांना सोमवारी (ता.२१) प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत भूस्सखलन, पूर परिस्थिती काळात करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार, सीपीआर पद्धत, अपघात काळातील करावयाच्या उपाययोजना व प्रथमोपचार, वायुगळती झाल्‍यास उपाययोजना या विषयावर प्रात्यक्षिक करण्यात आली.
पनवेल येथील सीकेटी महाविदयालयाच्या संयुक्त विद्यमाने आपत्तीविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पनवेल येथे आयोजित या प्रशिक्षणासाठी तहसीलदार विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये वरिष्‍ठ निरीक्षक महेंद्र पुनिया, जालिंदर फुंदे यांच्या पथकाने प्रशिक्षण दिले.
आपत्ती निवारणामध्ये स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांचा सहभाग किती महत्त्वाचा याची माहिती विजय पाटील यांनी दिली. निवासी नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी कार्यक्रमाची प्रास्तविक सादर केले. प्रशिक्षणासाठी पनवेल व उरण तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र, ग्रामसेवक, सरपंच, पोलिसपाटील, कोतवाल असे १५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com