पालीमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

पालीमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

Published on

पालीमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
पाली, ता. १७ (वार्ताहर) ः सुधागड सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा यांची जयंती शुक्रवारी (ता. १५) पाली येथील सुधागड तालुका सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज भवनमध्ये उत्साहात साजरी झाली.
यावेळी तालुकाध्यक्ष गोविंद लेंडी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन याबाबत जनजागृती केली. भगवान बिरसा मुंडा हे लोकनेते होते. त्यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमीन याबाबत जागरूक करून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली. बिरसा मुंडा यांनी तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांना विरोध केला आणि आदिवासींच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी आयुष्यभर काम केले. त्यांचे क्रांतिकारी विचार आणि देशभक्तीची भावना आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देते, असे लेंडी म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष गोविंद लेंडी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला अध्यक्ष सविता हंबीर, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत वारगुडे, गुलाबराव हिरवे, परळी विभागप्रमुख प्रकाश डुमना कार्यकारिणी सदस्य नामदेव पारधी शशिकांत ठोंबरे, पांडुरंग पारधी, लक्ष्मण बांगारे, कृष्ण मेंगाळ, लिंबाजी शिद, खुमा वारगुडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी झाली. उपस्थितांनी बिरसा मुंडा यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुंडा यांना विनम्र अभिवादन केले.

फोटो ओळ ः पाली ः बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करताना मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com