गगनगिरी मठात संत महात्म्यांची मंदियाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनगिरी मठात संत महात्म्यांची मंदियाळी
गगनगिरी मठात संत महात्म्यांची मंदियाळी

गगनगिरी मठात संत महात्म्यांची मंदियाळी

sakal_logo
By

खोपोली, ता. १२ (बातमीदार) : खोपोलीतील पूज्य गगनगिरी मठातील गगनगिरी महाराज पर्णकुटीवर सुवर्ण कलश स्थापित करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नाणीज धर्मपिठाचे पीठाधीश आचार्य नरेंद्र महाराज यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातून संत महात्‍म्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांचे आगमन गुरुवारी रात्रीच झाले असून, शुक्रवारी संत महात्म्यांची मंदियाळी असणार आहे. गगनगिरी मठ व्यवस्थापन समिती आणि समितीचे प्रमुख आशीष महाराज यांच्या नेतृत्वाखाली गगनगिरी महाराज भक्त गण यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता शाही मंगलस्नान, काकड आरती, धार्मिक पूजा अर्चा होणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवर संतांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गगनगिरी महाराज पर्णकुटीवर सुवर्ण कलशाची स्थापना करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05639 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top