खालापूर तहसील कार्यालयात ग्रंथालय सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खालापूर तहसील कार्यालयात ग्रंथालय सुरू
खालापूर तहसील कार्यालयात ग्रंथालय सुरू

खालापूर तहसील कार्यालयात ग्रंथालय सुरू

sakal_logo
By

खोपोली, ता. २५ (बातमीदार) : खालापूर तहसील कार्यालयात शासकीय कामासाठी अनेक नागरिक येतात. कामानिमित्त काही वेळ थांबणाऱ्या या नागरिकांचा वेळ वाचनात सार्थक ठरावा यासाठी सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या आवारात विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालय उभारले आहे. त्याचे उद्‍घाटन सोमवारी (ता. २३) कर्जत-खालापूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते झाले. या वेळी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते, खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार, नायब तहसीलदार विजय पुजारी आणि तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी. निरंजन, संघटक अखिलेश पाटीलने परिश्रम घेतले.

खोपोली : तहसीलदार कार्यालयात ग्रंथालयाचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05662 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top