ट्रक-दुचाकी अपघात तरुणीचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident
ट्रक-दुचाकी अपघात तरुणीचा जागीच मृत्यू

ट्रक-दुचाकी अपघात तरुणीचा जागीच मृत्यू

खोपोली : खोपोली-पाली रस्त्यावर देवन्हावे गावाजवळ ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रकखाली येऊन दुचाकीवरील पूजा शिदोरे (१८, रा. नागोठणे) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तरुणी नवी मुंबईतील भारती विद्यापीठात शिक्षण घेत होती. मित्रासोबत येथील ॲडलॅब इमॅजिका येथे सहलीसाठी येत असताना हा अपघात घडला.

खोपोली-पाली रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मागील तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. काम सुरू असल्याने काही ठिकाणी एकेरी अरुंद रस्ता आहे. अशाच अरुंद रस्त्यावरून दुचाकी जात असताना समोरून ट्रक आला. यात दुचाकी अनियंत्रित होऊन ट्रकला धडकली. अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कामात दिरंगाई व अरुंद रस्त्याने पुन्हा एक बळी घेतला. नागरिकांमध्ये संबंधित कंत्राटदार कंपनी व या कंत्राटदराला पाठीशी घालणाऱ्या शासन व्यवस्थेविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05697 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top