गॅस टँकरची गळती रोखल्‍याने दुर्घटना टळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस टँकरची गळती रोखल्‍याने दुर्घटना टळली
गॅस टँकरची गळती रोखल्‍याने दुर्घटना टळली

गॅस टँकरची गळती रोखल्‍याने दुर्घटना टळली

sakal_logo
By

खोपोली, ता. ६ (बातमीदार) ः वेळीच करण्यात आलेल्‍या उपायांमुळे सोमवारी दुपारी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर होऊ शकणारी संभाव्य दुर्घटना टळल्‍याचे समोर आले आहे. या महामार्गावरून एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्‍‌या टँकरचा रोटो गेज वॉल्‍व्हच्या नटमधून गॅस गळती सुरू होती. हा टॅंकर देहूरोड येथून पास होत असताना ही बाब चालकाच्या लक्षात आली. त्‍यावर त्याने गळती थांबवण्यासाठी प्राथमिक उपाययोजना केली. मात्र तो गेज बदलल्याशिवाय पर्याय नव्हता. भारत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून ही बाब अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय समूहाचे सदस्य व केमिकल तज्ञ धनंजय गीध यांच्या लक्षात आणून देण्यात आली. त्‍यानंतर गीध यांनी सदर टँकरला महामार्गावर गाठले. हा टँकर दांड फाट्याजवळ निर्मनुष्य जागी नेण्यात आला व तेथे त्‍याची तपासणी करण्यात आली. सर्व सुरक्षेचे निकष लक्षात घेत त्या टँकरचा तो लिकेज असलेला नट बदलला व गॅस गळती थांबली. दरम्‍यान, हा टँकर शहरातील रस्त्यावर व तेथील गर्दीत गेला असता आणि तेथे गॅस गळती वाढली असती तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र वेळीच करण्यात आलेल्‍या उपाययोजनेमुळे हा अनर्थ टळल्‍याचे बोलले जात आहे.
Asso

ciated Media Ids : KHP22B06632, KHP22B06633

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05704 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top