वायर कंपनीत कामगाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायर कंपनीत कामगाराचा मृत्यू
वायर कंपनीत कामगाराचा मृत्यू

वायर कंपनीत कामगाराचा मृत्यू

sakal_logo
By

खोपोली, ता. १३ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील ढेकू गावातील सिस्टीमिटीक वायर प्रा.लि. कंपनीमध्‍ये पत्र्याच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी चढलेल्या रफीक नवाज खान या तरुणाचा पत्र्याच्या शेडवरून पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१२ जून) सायंकाळी घडली. प्राथमिक चौकशीत सुरक्षेची खबरदारी घेण्यात कंपनी व्यवस्थापनाचा हालगर्जीपणा स्पष्ट होत असल्याने कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी रफीक नवाज खान चढला होता. यादरम्यान पत्रा फुटल्याने डांबराच्या बादलीसह पंचवीस फुटांवरून तो खाली पडला. कंपनी व्यवस्थापकांनी त्‍याला तातडीने खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आणले; परंतु रफीक खान याचा त्‍यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती कळताच खोपोली पोलिस ठाण्याचे सहय्यक पोलिस निरीक्षक हरेष कळसेकर यांनी प्राथमिक तपास केला. त्‍यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. दरम्‍यान, भरपाई दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्यावर पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी मध्यस्थी करीत मृताच्या कुटुंबाला प्राथमिक तीन लाखांची मदत मिळवून दिली. त्यानंतर पोलिसांनी कंपनीतील घटनास्थळी पाहणी केल्यावर उंच ठिकाणी काम चालू असल्याने कामगारांना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट तसेच जाळी आदीची काळजी घेतली नसल्यामुळे कंपनी व्यवस्थापक आणि ठेकादाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेष कळसेकर करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05721 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top