
बोरघाट द्रुतगती मार्गावर दोन ट्रकमध्ये अपघात
खोपोली, ता. १६ (बातमीदार) : बोरघाट द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (ता. १६) सकाळी ९.३० च्या सुमारास बोरघाट उतारावर दोन ट्रकमध्ये अपघात झाला. सिमेंटची वाहतूक ट्रकला तांदळाच्या ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. यात ट्रक उलटून मागील ट्रकमधील चालक आणि क्लिनर अडकले होते.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि ॲफकोन कंपनीचा यंत्रणांनी तातडीने मदतकार्य करून दोन्ही जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले. तसेच बोरघाट पोलिस ठाण्याच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनेची तीव्रता कमी करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान ट्रक उलटल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक एक तास विस्कळित झाली होती. या दरम्यान हलक्या वाहनांना जुन्या महामार्गावरून खोपोलीमार्गे सोडण्यात आले. तरीही खोपोली शीळफाटा ते शासकीय गेस्ट हाऊस पर्यंतच्या अंतरावरही काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. येथील वाहतूक एक तासानंतर सुरळीत झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05729 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..