आम्ही खोपोलीकर ग्रुपकडून वृक्षलागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही खोपोलीकर ग्रुपकडून वृक्षलागवड
आम्ही खोपोलीकर ग्रुपकडून वृक्षलागवड

आम्ही खोपोलीकर ग्रुपकडून वृक्षलागवड

sakal_logo
By

खोपोली, ता. ५ (बातमीदार) : ''आम्ही खोपोलीकर आमचं ठरलय'' संघटनेच्या माध्यमातून खोपोलीतील मुंबई-पुणे महामार्गावर वृक्षलागवड करण्यात आली. खोपोली क्षेत्रात महामार्ग रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच रस्त्याच्या दुभाजकांमध्ये दोन महिन्यांपूर्वी काही झाडे संबंधित ठेकेदारांनी लावली होती; परंतु योग्य देखभालीअभावी ती सर्व झाडे सुकली आहेत. याच ठिकाणी सामाजिक उपक्रमांअंतर्गत सोमवारी आम्ही खोपोलीकर संस्थेच्या माध्यमातून नव्याने वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमात राहुल शेडगे, शशी मानकवले, प्रदीप मोरे, गणेश ठाकरे, नीलेश पाटील, भाऊ सनस, अशोक मोरे, सचिन यादव, महेश काजळे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05770 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top