खोपोलीत आपत्कालीन यंत्रणा मजबूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत आपत्कालीन यंत्रणा मजबूत
खोपोलीत आपत्कालीन यंत्रणा मजबूत

खोपोलीत आपत्कालीन यंत्रणा मजबूत

sakal_logo
By

खोपोली, ता. १० (बातमीदार)ः खोपोली व परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक अनुप दुरे यांनी सतर्कता म्‍हणून पालिकेची आपत्कालीन पथक तयार केले आहे. तसेच दगरडग्रस्त भागातील लोकांच्या स्थलांतरासाठी शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीत कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपाययोजना होण्यासाठी मुख्याधिकारी यांनी शहरातील यशवंती हायकर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, सर्पमित्राची संयुक्त बैठक घेतली.बैठकीत पालिका प्रशासन आणि सामाजिक संघटनांमध्ये उत्तम समन्वय राखण्याचे सूचना मुख्याधिकारी दुरेंनी यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
खोपोली नगरपालिका क्षेत्रात काजूवाडी, सुभाषनगर हे दरडग्रस्त रहिवासी भाग आहेत. या संदर्भात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्व मोठे नाले पातळगंगा नदीला जोडलेले असल्यामुळे अतिवृष्टीमुळे नाल्यातील पाणी रहिवासी भागांत शिरते. पाताळगंगा नदीकाठी मोठ्या वस्त्या आहेत. नदी केव्हाही धोक्याची पातळी ओलांडू शकते तसेच झेनिथ धबधब्‍यावरही दुर्घटना घडण्याची शक्‍यता लक्षात घेउन खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. या वेळी उपमुख्याधिकारी गौतम भगळे, अपघातग्रस्त मदतीसाठी संस्‍थेचे गुरूनाथ साठेलकर, पद्माकर गायकवाड, संदीप पाटील, सर्पमित्र अमोल ठकेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05777 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..