अपघातग्रस्‍त टँकर काढण्यात खोपोलीतील देवदुतांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातग्रस्‍त टँकर काढण्यात खोपोलीतील देवदुतांची मदत
अपघातग्रस्‍त टँकर काढण्यात खोपोलीतील देवदुतांची मदत

अपघातग्रस्‍त टँकर काढण्यात खोपोलीतील देवदुतांची मदत

sakal_logo
By

अपघातग्रस्‍त टँकर काढण्यात खोपोलीतील देवदुतांची मदत

खोपोली, ता.२६ (बातमीदार) ः जयगड येथून नागपूरच्या दिशेने एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा सातारा जिल्ह्यातील मायणी ते मल्हारपेठ रस्त्यावर मौजे चितळी गावानजीक रविवारी सायंकाळी अपघात झाला. साईडपट्टीवरून ट्रेलरची मागील ट्रॉली कलंडल्‍याने साधारण २२ टन क्षमतेचा एलपीजी गॅसने भरलेला टँकर शेतात कलंडला.
अपघात झाल्याची माहिती वडूज पोलिस यंत्रणेला कळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एलपीजी ज्वलनशील गॅस असल्याने गळतीची शक्यता गृहीत धरून लागलीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली. अपघातग्रस्त टँकरच्या एजन्सीकडून ही बाब खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या धनंजय गीध यांना कळल्‍यावर ते विजय भोसले आणि हनीफ कर्जीकर यांच्यासह घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाले.
दुसऱ्या दिवशी तीन तासांच्या प्रयत्‍नानंतर तीन क्रेनच्या साह्याने टँकर उचलण्यात यश आहे. टँकरमध्ये २२ टन एलपीजी गॅस होता, तर त्या टँकरचे वजन ११२ टन होते.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05809 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..