''हर घर तिरंगा'' अभियानासाठी जनजागृती रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''हर घर तिरंगा'' अभियानासाठी जनजागृती रॅली
''हर घर तिरंगा'' अभियानासाठी जनजागृती रॅली

''हर घर तिरंगा'' अभियानासाठी जनजागृती रॅली

sakal_logo
By

खोपोली, ता. ९ (बातमीदार)ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबत शासनाच्या वतीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्‍या अनुषंगाने खोपोली शहरातील सह्याद्री विद्यालयाच्या वतीने सोमवारी शीळफाटा परिसरात रॅली काढून ‘हर घर तिरंगा’ अभियानासाठी जनजागृती करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन खोपोलीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख डॉ. सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष नरेंद्र शहा, मुख्याध्यापिका समीक्षा ढोके, संस्थेचे सदस्य दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे, राजेंद्र फक्के यांच्यासह बाबू पुजारी, खेमंत टेलर आदी उपस्थित होते.

खोपोली : सह्याद्री विद्यालय आयोजित हर घर तिरंगा प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05845 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..