खोपोलीत दोनशे दहा किलो गांजा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत दोनशे दहा किलो गांजा जप्त
खोपोलीत दोनशे दहा किलो गांजा जप्त

खोपोलीत दोनशे दहा किलो गांजा जप्त

sakal_logo
By

खोपोली, ता. २ (बातमीदार) : मुंबई-पुणे महामार्गावरून झायलो गाडीत गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे एनसीबीने गुरुवारी रात्री पुण्याहून फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत खोपोली हद्दीतील लौजीजवळ २५ लाख किमतीचा २१० किलो गांजा जप्त केला. एक्स्प्रेस-वेवर खालापूर टोलनाक्यावर वाहतूककोंडीत पकडले जाणार असल्याचे गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींना कळताच, पोलिसांना चकवा देण्यासाठी खंडाळा घाटात खोपोली बाह्यवळणावरून खोपोली शहरातील लौजी परिसरात त्यांनी पळ काढला. दरम्यान, एनसीबी टीमने पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेत झायलो गाडीमधील एक आरोपी पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05900 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..