मुंबई-पुणे मार्गांवर तीन भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-पुणे मार्गांवर तीन भीषण अपघात
मुंबई-पुणे मार्गांवर तीन भीषण अपघात

मुंबई-पुणे मार्गांवर तीन भीषण अपघात

sakal_logo
By

खोपोली, ता. १२ (बातमीदार) : सोमवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास बोरघाटात जुना मुंबई-पुणे महामार्ग व द्रुतगती मार्गावर या दोन्ही ठिकाणी तीन वेगवेगळ्या अपघातांत एकूण चार जण जखमी झाले. यातील दोन अपघात अतिशय भीषण होते; मात्र यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
यात पहिला अपघात जुन्या मुंबई-पुणे महामार्ग बोरघाटमधील तीव्र वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात घडला. यात दुचाकीवरील चालक गोविंद जाधव व महिला पूजा जाधव असे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. त्याचदरम्यान बोरघाटात अन्य एक ट्रक उलटून अपघात घडला, यात ट्रक चालक जखमी झाला. या अपघातातील जखमींना मदतकार्य पूर्णत्वास येत नाही, तोच द्रुतगती मार्गावर बोरघाटात आडोशी उतारावर एकूण चार वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात घडला. यात कारमधील एक जण जखमी झाला आहे.
या सर्व जखमींना महामार्ग वाहतूक पोलिस, आयआरबी आपत्कालीन यंत्रणा व सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05918 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..