ब्रेक फेल झाल्‍याने ट्रेलरचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेक फेल झाल्‍याने ट्रेलरचा अपघात
ब्रेक फेल झाल्‍याने ट्रेलरचा अपघात

ब्रेक फेल झाल्‍याने ट्रेलरचा अपघात

sakal_logo
By

खोपोली, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी उतारावर गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रेलरचे ब्रेक फेल झाल्‍याने अज्ञात वाहनाला ठोकर दिली आणि ट्रेलर रस्त्यालगतचे बॅरिकेट्स तोडून उलटला. अपघातात जायर हुसेन गुलबुद्दीन छोटे, (३६, रा. मध्य प्रदेश) हा ट्रेलरचालक जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलिस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, मृत्युंजय देवदूत, आणि लोकमान्य यंत्रणेची ॲम्बुलन्स तेथे दाखल झाली. अर्ध्या तासाच्या प्रयत्‍नानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ एमजीएम रुग्‍णालयात दाखल केले आहे.
रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान काही काळ द्रुतगती मार्गावरील वाहतूक बाधित झाली होती. खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला असून निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

खोपोली : अपघातग्रस्त ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढताना आपत्कालीन यंत्रणा.

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05925 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..