सहज ‘स्वर्गरथ’ची अविरत सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहज ‘स्वर्गरथ’ची अविरत सेवा
सहज ‘स्वर्गरथ’ची अविरत सेवा

सहज ‘स्वर्गरथ’ची अविरत सेवा

sakal_logo
By

अनिल पाटील, खोपोली
कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजला असताना अनेकजण भीतीपोटी स्‍वकियांच्या अंत्यविधीसाठीही पुढे येत नव्हते. समाजातील ही अडचण पाहून सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून अंत्ययात्रेसाठी सहज स्वर्ग्ररथाची निर्मिती करण्यात आली. खोपोली क्षेत्रातील निधन झालेल्या नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी दिवस-रात्र निःशुल्क सेवा तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या हस्ते व विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.
सातत्यपूर्ण सेवेच्या ७२९ दिवसांत खोपोली नगरपरिषद क्षेत्रात दिवस रात्र सेवा पुरविण्यात आली. ५०० पेक्षा जास्‍त मृत व्यक्तींना या स्वर्गरथातून नेण्यात आले आहे. शिवाय संस्थेच्या माध्यमातून १ जानेवारी २०१९ पासून सुरू असलेली अन्नसेवा आजपर्यंत सुरू आहे.
संस्‍थेच्या माध्यमातून सुरू असलेली निसर्ग शाळा महाराष्ट्रात शिक्षणासाठी रोल मॉडेल ठरत आहे. सहज सेवेच्या माध्यमातून अल्प काळासाठी वैद्यकीय उपकरणेही उपलब्ध असल्‍याचे संस्‍थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे सांगितले.

खोपोलीत बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमीत जाण्यासाठी लागणारा वेळ व मदतनीस नसताना सहज स्वर्गरथ सेवेमुळे शहरवासीयांना अडचणीच्या काळात खूप मोलाची मदत होत आहे. खोपोली परिसरात निःशुल्क सेवा पुरविणाऱ्या सहजसेवा फाउंडेशनच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे गरजूंना फायदा झाला आहे.
- आयूब तांबोळी, तहसीलदार, खालापूर

Web Title: Todays Latest Marathi News Khp22b05928 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..