गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी
गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी
गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी

गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी गृहनिर्माण व्यवसायाला सोनेरी झळाळी

sakal_logo
By

खोपोली, ता. ४ (बातमीदार) ः मुंबई विकास प्राधिकरण, नवी मुंबई विमानतळाचे सुरू असलेले काम, निर्माण होत असलेल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, नव्याने उभे राहत असलेले उद्योग-व्यवसाय आणि दळणवळणाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने रायगड जिल्ह्यात खोपोली शहराला नवीन घर घेणाऱ्यांकडून पसंती मिळत आहे. दोन वर्षे येथील गृहनिर्माण व्यवसाय काहीसा मंदावला होता. या वर्षी काहीशी तेजी असून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून दिवाळीपर्यंत खोपोली शहर व परिसरात गृह निर्माण व्यवसायाला चांगले दिवस येण्याचा विश्वास विकसक व संबंधित व्यावसायिकांना आहे. याचा ग्राहकांना ही लाभ व्हावा यासाठी नामांकित विकसकांनी दसऱ्याच्या निमित्ताने आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.

शांत व सुसंस्कृत शहर, पाताळगंगा नदीच्या माध्यमातून बारमाही उपलब्ध असणारे पाणी, मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वे, जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच थेट मुंबईला जोडणारी लोकल सेवा हे खोपोलीचे मुख्य दुवे आहेत. शहरात गगनगिरी महाराज मठाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले आंतरराष्ट्रीय योग व ध्यान साधना केंद्र, नगरपालिकेच्या माध्यमातून वाढती लोकसंख्या लक्षात घेत मजबूत पायाभूत सुविधांच्या निर्मिती करण्यात आली आहे. त्‍यामुळे मुंबई-पुण्यातील अनेक नामांकित गृहनिर्माण संस्था व बांधकाम कंपन्यांनी खोपोली व परिसरात ३५० हून अधिक प्रकल्प सुरू केले आहेत.

दसऱ्यासाठी खास योजना
दसऱ्यानिमित्त अनेक विकसकांनी क्लब मेमरशिप मोफत, जीएसटी शून्य, सोसायटी रजिस्टर मोफत आदी योजना दिल्या आहेत. काहींनी २२ लाखांचा फ्लॅट २० लाखाने विक्रीची सवलत देत दोन लाखांची सूट दिली आहे. शिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्‍तूंची देण्यात येत आहेत. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत येथील गृहनिर्माण क्षेत्रात तेजी पाहायला मिळेल, असा विश्‍वास संबंधित व्यावसायिकांना आहे.

वाढते शहरीकरण, लोकसंख्या लक्षात घेऊन विकास आराखडा बनवला आहे. अनेक पायाभूत सुविधा व विकास कामे पूर्णत्वास येत आहेत. सर्व नियम व अटी-शर्ती पूर्ण करणारा व कोणताही आक्षेप नसलेला नवीन गृहनिर्मिती प्रकल्प मंजुरीसाठी आल्यावर नगरपालिकाकडून लवकरात लवकर मंजुरी दिली जात आहे.
- अनुप दुरे पाटील
मुख्याधिकारी खोपोली नगरपालिका

दोन-तीन वर्षांपासून बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आहे. मात्र नवी मुंबई विमानतळ व प्रस्तावित उद्योग-व्यवसाय, पायाभूत सुविधा बाबत सुरू असलेले नियोजन, येऊ घातलेल्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था बघता पुढील दीड-दोन वर्षात येथील मंदीचे सावट दूर होईल व रायगड जिल्ह्यातील इतर शहरांबरोबर पाच टक्के अधिक खोपोली व कर्जतमध्ये गृहनिर्माण व्यवसाय वाढेल.
- अतिक खोत, संचालक,
आशियाना ड्रीम होम, खोपोली

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खोपोलीत अनेक नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू होत आहेत. विविध ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना लागू असून व दरातही सूट दिली आहे. याचा थेट लाभ मिळत असून १० ते १५ टक्के बुकिंग वाढेल, असा अंदाज आहे.
- खेमत टेलर, संचालक
बी कल्याणजी ग्रुप, खोपोली