निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात
निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात

निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात

sakal_logo
By

खोपोली (बातमीदार) ः खोपोली नगरपरिषदेतने २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत निवृत्त झालेल्‍या ६२ कर्मचाऱ्यांचे सातवे वेतन आयोगाप्रमाणे उपदान (ग्रॅच्युइटी) व रजावेतन फरकाची रक्कम खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी मंजूर केली आहे. या रकमेच्या धनादेशाचे वाटप संबंधित कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी तातडीने तातडीने घेण्यात आल्‍याचे यावेळी दुरे यांनी सांगितले. कार्यक्रमास लेखाधिकारी सोनीनाथ तुपे, सहायक अधिकारी मयूरी पाटील, शिवसेना शिंदे गटाचे खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते. निवृत्त कर्मचारी विष्णू पाटील, डी.पी.पाटील, अस्लम कर्जेकर, सुखदेव मंडलिक व इतर सर्व कर्मचाऱ्यांना मिळून एकूण दोन कोटी ४० लाख २७ हजार ३७३ रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

खोपोली : निवृत्त कर्मचाऱ्यांना धनादेश देताना अनुप दुरे