विरेश्वर मंदिर तळ्याची सफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरेश्वर मंदिर तळ्याची सफाई
विरेश्वर मंदिर तळ्याची सफाई

विरेश्वर मंदिर तळ्याची सफाई

sakal_logo
By

खोपोली, ता. २३ (बातमीदार) ः काही दिवसांपासून टाटा पॉवर कंपनीत तांत्रिक डागडुजी व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने, पॉवर प्लांटमधून पाण्याचा निचरा कमी होत आहे. त्याचा परिणाम खोपोलीतील विरेश्वर तलावातील पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे खोपोली शहरातील पाणीपुरवठाही बाधित झाला आहे. मात्र या संधीचा लाभ उठवत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी तात्या रिठे व साथीदारांनी तळ्याची सफाई मोहीम सुरू केली आहे.
तलावात गणपती व देवी विसर्जन झाल्यानंतर मूर्ती विरघळल्यानंतर काथ्या व अन्य कचरा मोठ्या प्रमाणावर जमा झाला आहे. गाळ जमा झाल्‍यानेही पाणीसाठा कमी होत आहे. याची दखल घेत तात्या रिठे, कृष्णकांत विचारे, श्रीकांत यादव यांनी आदिवासी वाडीतील मुलांना मोबदला देत त्यांच्या सहकार्याने तळ्याची सफाई मोहीम सुरू केली आहे. तळ्‌यातून काढलेला कचरा नगरपालिका सफाई विभागामार्फत तातडीने उचलला जात आहे. यासाठी सफाई विभागातील अधिकारी वैभव ओव्हाळ व मुख्याधिकारी अनुप दुरे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळल्‍याचे रिठे यांनी सांगितले.

खोपोली : विरेश्वर तळ्याची स्‍वच्छता करण्यात आली.