द्रुतगती मार्गावर ट्रकला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावर ट्रकला आग
द्रुतगती मार्गावर ट्रकला आग

द्रुतगती मार्गावर ट्रकला आग

sakal_logo
By

खोपोली, ता. २८ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणेच्या दिशेने आडोशी टनेलजवळ शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास माल भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण आणण्यात यंत्रणांना एक ते दीड तास लागला. या वेळेत पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक रोखण्यात आली होती.

आर.जे-२७ जीडी- ४८६६ या क्रमांकाचा ट्रक मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होता. अचानक शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली. ट्रकला आग लागताच ट्रकचालक आणि त्याचा सहकारी दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी आय.आर.बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि खोपोली पालिका फायर ब्रिगेड यांनी ही आग विझवली. या दरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतूक रात्री २.४० ते ३.१० यावेळेत रोखण्यात आली होती. ही घटना खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.