खोपोलीत भारत जोडो यात्रेसाठी मित्रपक्ष एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत भारत जोडो यात्रेसाठी मित्रपक्ष एकत्र
खोपोलीत भारत जोडो यात्रेसाठी मित्रपक्ष एकत्र

खोपोलीत भारत जोडो यात्रेसाठी मित्रपक्ष एकत्र

sakal_logo
By

खोपोली (बातमीदार) : खासदार तथा अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. या यात्रेला समर्थन देण्यासाठी खोपोलीत महाविकास आघाडीतील सर्व राजकीय मित्र पक्ष एकवटले आहेत. खोपोलीत सर्व मित्रपक्षांची खोपोली शहर भारत जोडो यात्रा रविवारी (ता. ६) निघणार आहे. या यात्रेत शहर काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शेकाप यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शीळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून ही यात्रा निघणार आहे. त्यानंतर महामार्गावरून खोपोली बाजारपेठमार्गे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सभा होऊन ही यात्रा संपुष्टात येणार आहे, अशी माहिती खोपोली शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी दिली.