विनायक मेटे अपघातप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनायक मेटे अपघातप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा
विनायक मेटे अपघातप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

विनायक मेटे अपघातप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

sakal_logo
By

खोपोली, ता. १६ (बातमीदार) ः शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्युप्रकरणातील सबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागले आहेत. या अपघाताला मेटे यांचा कारचालक जबाबदार असल्याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी वाहनचालकावर रसायनी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मते घेतली गेली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता. हा अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे झाल्याचे समोर आले. यामुळे चालक एकनाथ कदमविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वी (१४ ऑगस्ट) मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता.
...