खोपोली पाणीसमस्या बाबत पहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोली पाणीसमस्या बाबत पहाणी
खोपोली पाणीसमस्या बाबत पहाणी

खोपोली पाणीसमस्या बाबत पहाणी

sakal_logo
By

खोपोली, ता. २३ (बातमीदार) ः खोपोलीतील नागरिकांना आठवड्यातील दोन-तीन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टाटा पॉवरकडून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्‍याने महिन्याभरापासून ही परिस्‍थिती निर्माण झाली आहे. पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्‍याचा आरोप स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे. बुधवारी या संदर्भात माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर व गगनगिरी महाराज मठाचे प्रमुख आशिष महाराज यांच्या नेतृत्वाखाली माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणी टंचाई समस्येबाबत पाहणी केली. या वेळी मुख्याधिकारी अनुप दुरे, टाटा पॉवर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अभिजित पाटील यांना बोलावून पाणी टंचाई मागील कारणे व समस्यांबाबत चर्चा होऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तात्या रिठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनेश यादव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

खोपोली : पाणी टंचाईबाबत जलवाहिन्या, अन्य यंत्रणांची पाहणी करण्यात आली