Fri, Feb 3, 2023

खोपोलीत जगदीश गायकवाड यांच्या विरोधात प्रचंड मोर्चा
खोपोलीत जगदीश गायकवाड यांच्या विरोधात प्रचंड मोर्चा
Published on : 4 December 2022, 4:45 am
खोपोली (बातमीदार) : आंबेडकरी विचार मंच, खोपोलीच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नागरिकांनी जगदीश गायकवाड यांच्याविरोधात मोर्चा काढून त्यांचा निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. माजी खासदार डॉ. प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबाबत निंदनीय वक्तव्य आरपीआयचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष व भाजप नेते जगदीश गायकवाड यांनी काढल्याने त्यांच्याविरोधात आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. खोपोलीतही रविवारी (ता. ४) निषेध मोर्चा व प्रेतयात्रा काढून जगदीश गायकवाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या वेळी आंबेडकरी विचार मंचचे पदाधिकारी, शहरातील आंबेडकरी विचारांचे सर्वपक्षीय नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.