
Mumbai Pune Expressway: द्रुतगती मार्गावर तीन कारचा अपघात
खोपोली, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवार सकाळी सहाच्या सुमारास तीन गाड्यांचा अपघात झाला. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
मुंबईकडे जाणारा ट्रकचालक आर. अरुण (३६, रा. कर्नाटक) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर आणखी एका कारला धडक देत काही अंतर फरफटत नेले. यात कारमधील एक महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात बाधित झालेल्या दोन्ही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावल्याने मोठी जीवितहानी टळल्याने प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग पथक, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, बोरघाट वाहतूक पोलिस, डेल्टा फोर्सचे जवानांनी मदतकार्य केले. बाधित वाहने लागलीच बाजूला करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. हा अपघात खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे.
खोपोली : अपघातग्रस्त कार