ईसाळवाडीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईसाळवाडीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
ईसाळवाडीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

ईसाळवाडीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

sakal_logo
By

खोपोली, ता. ८ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील चौकपासून जवळपास ४ किमी अंतरावर असलेल्या ईसाळवाडीतील रायगड जिल्‍हा परिषदेची आठ महिन्यांपासून बंद आहे. त्‍यामुळे विद्यार्‍थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत सरकारी दरबारी अनेकदा निवेदन दिले आहे, मात्र तरीही शाळा सुरू न झाल्‍याने पालकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.
पटसंख्या घटल्यामुळे ईसाळवाडीतील शाळा बंद करण्यात आली. मात्र त्‍यामुळे वाडीतील १० ते १५ मुले शिक्षणांपासून वंचित राहत आहेत. दुर्गम भागातील या शाळेत, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्‍या शाळेतील मुले शिक्षण घेत आहेत.
शाळा बंद झाल्‍यामुळे वाडीतील काही मुलांना आश्रम शाळेत टाकण्यात आले आहे, मात्र गावापासून ही शाळा लांब असल्‍याने विद्यार्थ्यांना रोज चालत जाणे शक्य नाही. यामुळे बंद पडलेली शाळा सुरू करण्याची मागणी ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता, पटसंख्या उपलब्‍ध होत नसल्याने सदर शाळा बंद पडली असून पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्‍याचे सांगण्यात आले.

रायगड जिल्‍हा परिषदेची शाळा ईसाळवाडी सुरू झाली असती तर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नसते. यामुळे नाइलाजाने आम्हाला मुलांना माणगाव, चिखले, पनवेल आश्रम शाळेत टाकावे लागले.
- जगदीश पारधी, पालक ईसाळवाडी

खोपोली ः ईसाळवाडीतील शाळा बंद करण्यात आली.