निलंबित कामगार पुन्हा कामावर रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलंबित कामगार पुन्हा कामावर रुजू
निलंबित कामगार पुन्हा कामावर रुजू

निलंबित कामगार पुन्हा कामावर रुजू

sakal_logo
By

खोपोली, ता. ८ (बातमीदार)ः सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा भूषण स्टील कारखान्यातील नऊ कामगारांवर युनियन वादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईविरोधात कामगारांचा दहा वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशस्वी मध्यस्थीने कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यास कंपनीकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
सुनील दिसले, रूपेश पाटील, दत्तात्रेय मिरगळ, सागर भुईकोट, विश्वनाथ मुंडे, संदीप मिरगळ, अशपाक दुदुके ,अनिल पाठक व कमलाकर मुर्गनेशन या कामगारांना कामावरून निलंबित केले होते. दहा वर्ष हे कामगार वेगवेगळ्या माध्यमातून व्यवस्थापनाशी चर्चा करीत होते. मात्र त्यास यश येत नव्हते. सावरोली गावचे माजी सरपंच तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गोविंद बैलमारे यांच्या नेतृत्त्वाखाली सावरोलीतील ग्रामस्‍थांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. त्‍यानुसार थोरवे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केल्‍याने कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यास कंपनीने सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे.
खोपोली -