Fri, June 9, 2023

दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
Published on : 14 February 2023, 12:55 pm
खोपोली, ता. १४ (बातमीदार) ः सुभाषनगर येथील रूपेश मोहिते (२४) दुचाकीवरून पाली ते खोपोली जात होता. जांभुडपाड्याजवळ नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी मित्राच्या हळदी कार्यक्रमासाठी तो पाली येथे गेला होता. रात्री उशिरा खोपोलीला परतत असतांना तीव्र वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी अनियंत्रित होऊन घसरली. खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद पाली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.