खोपोलीत महाशिवरात्रोत्‍सवाची जोरदार तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत महाशिवरात्रोत्‍सवाची जोरदार तयारी
खोपोलीत महाशिवरात्रोत्‍सवाची जोरदार तयारी

खोपोलीत महाशिवरात्रोत्‍सवाची जोरदार तयारी

sakal_logo
By

खोपोली, ता. १६ (बातमीदार) ः शहराचे ग्रामदैवत व पेशवेकालीन भगवान वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्‍सवानिमित्त जोरदार तयारी करण्यात सुरू आहे. वीरेश्वर मित्र मंडळ, वरची खोपोली रहिवासी मंडळ व गगनगिरी महाराज मठाच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरातन वीरेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. वीरेश्वर तलाव परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण सुरू आहे. शनिवारी जवळपास ५० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पहाटे महापूजा, महाआरती व अन्य धार्मिक विधी पार पडल्यावर मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे.
महाशिवरात्री निमित्ताने पालखी सोहळा, मंदिर सभामंडपात दिवसभर भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शहरातील भैरवनाथ मंदिर, मोगलवाडी -भानवज येथील बारा जोतिर्लिंग मंदिर, शीळफाटा येथील शंकर मंदिरातही सजावट व रोषणाई करण्यात आली आहे.

खोपोली : खोपोलीतील पेशवेकालीन भगवान वीरेश्वर मंदिर