Thur, June 1, 2023

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू
Published on : 22 February 2023, 11:21 am
खोपोली, ता. २२ (बातमीदार)ः मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खोपोली शहरातील ख्रिश्चन समाज स्मशानभूमी जवळ बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकी, दुभाजक व रस्त्यालगतच्या विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. यात दुचाकीस्वार भूषण आयगल (३७, शास्त्रीनगर, खोपाली) याचा मृत्यू झाला. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.