आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार

sakal_logo
By

खोपोली, ता. १ (बातमीदार) ः कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून २० हजाराच्या मताधिक्याने निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार शनिवारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड संपर्कप्रमुख सुनील घरत, महिला जिल्हा अध्यक्षा अश्विनी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, रवींद्रनाथ पाटील, दिलीप म्हसे, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, महिला शहर अध्यक्षा शोभा काटे, यशवंत साबळे, सूर्यकांत देशमुख, शहर सचिव हेमंत नांदे आदी उपस्थित होते. राज्यातील शिक्षकांच्या ३३ संघटनानी आपल्याला पाठिंबा दिला त्यामुळेच २० हजार मतांनी निवडून आलो, हा विजय सर्व शिक्षकवर्गाचा असून त्‍याचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.
रायगड जिल्हा व खोपोलीमधील एकही शिक्षकांचे काम रखडू देणार नसल्याचे आश्वासन म्हात्रे यांनी या वेळी दिले.

खोपोली : ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांनी सत्‍कार केला.