महामार्गावर बोरघाटाच्या पायथ्याशी गतिरोधक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर बोरघाटाच्या पायथ्याशी गतिरोधक
महामार्गावर बोरघाटाच्या पायथ्याशी गतिरोधक

महामार्गावर बोरघाटाच्या पायथ्याशी गतिरोधक

sakal_logo
By

महामार्गावर बोरघाटाच्या पायथ्याशी गतिरोधक
खोपोली, ता. ८ (बातमीदार)ः अपघातांना आळा घालण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ज्या ठिकाणाहून बोरघाट सुरू होतो, त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आला आहे. खोपोली शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग व महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या शाळा, हॉटेल व अन्य दुकाने या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक-विद्यार्थी व पालकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. यात अनेकदा लहानमोठे अपघात घडतात. हे टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी मनसेचे जे. पी. पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाकडे केली होती. त्यानुसार केएमसी महाविद्यालयासमोर गतिरोधक बसवले आहे.

खोपोली : महामार्गावर गतिरोधक बसवण्यात आले आहे.