खोपोलीत काँग्रेसचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीत काँग्रेसचा जल्लोष
खोपोलीत काँग्रेसचा जल्लोष

खोपोलीत काँग्रेसचा जल्लोष

sakal_logo
By

खोपोलीत काँग्रेसचा जल्लोष

खोपोली, ता. १४ (बातमीदार) ः कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या धमाकेदार विजयाचा आनंद देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व आनंदोत्‍सव साजरा करून केला. खोपोलीत शहर काँग्रेसकडून शनिवारी संध्याकाळी येथील समाज मंदिर चौकात फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्‍त केला. यावेळी भारत जोडो, नफरत छोडो, राहुल गांधी जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही विजयाचे पेढे भरविले. या वेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, महिला अध्यक्ष रेखा जाधव, ज्‍येष्ठ पदाधिकारी प्रवीण ऊर्फ बंडू क्षीरसागर, शेकापचे पदाधिकारी श्याम कांबळे, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, युवक काँग्रेसचे ॲड संदेश धावरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खोपोली : कर्नाटकमधील विजयानंतर खोपोलीत जल्लोष करण्यात आला.