खंडाळा घाटात रिक्षा उलटली, चौघे जखमी

खंडाळा घाटात रिक्षा उलटली, चौघे जखमी

खोपोली, ता. ३० (बातमीदार) : परळी वैजनाथ येथून मुलीचे लग्न उरकून नवी मुंबईकडे रिक्षाने येत असलेल्या कुटुंबाचा खंडाळा घाटात रिक्षा उलटून भीषण अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या अपघातात दाम्पत्यासह त्यांच्या तीन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुरेखा गुट्टे (वय ४१) व विष्णू गुट्टे (वय ४६) असे जमखी दाम्पत्याचे नाव आहे. जखमी मुलींची नावे समजू शकली नाहीत. सुरेखा गंभीर जखमी झाल्यामुळे एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
विष्णू गुट्टे हे नवी मुंबईला राहण्यास असून ते कुटुंबासह त्यांचे मूळ गाव परळी वैजनाथ येथे मुलीच्या लग्न समारंभासाठी गेले होते. लग्नकार्य उरकून मंगळवारी नवी मुंबईला आपल्या स्वतःच्या रिक्षाने पत्नी व तीन मुलींना घेऊन ते येत होते. खंडाळा घाटात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिंग्रोबा मंदिराजवळ तीव्र वळण व उतारावर रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाहेर जाऊन उलटली. यात विष्णू राम गुट्टे व दोन मुली किरकोळ; तर पत्नी सुरेखा या गंभीर जखमी झाल्या आहेत. रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा घाट वाहतूक पोलिस यंत्रणा तसेच अन्य यंत्रणांनी तात्काळ मदत करून अपघातातील जखमींना तातडीने खोपोली पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com