अल्पवयीन मुलीशी विवाह करणा-याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update mumbai child marriage of minor girl police arrest accuse
अल्पवयीन मुलीशी विवाह करणा-याला अटक

अल्पवयीन मुलीशी विवाह करणा-याला अटक

महाड : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणावर महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना महाड तालुक्यातील ढालकाठी या गावात घटना घडली. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजेंद्र जाधव असे असून तो ढालकाठी गावचा रहिवासी आहे; तर पीडित अल्पवयीन मुलगी ही शेजारच्या गावातील आहे.

पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही राजेंद्र याने तिला फूस लावून तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्याशी लग्न केले. यानंतर त्याने तिच्यासोबत महाड, खरवली व ठाणे या ठिकाणी अनैतिक संबंध ठेवले. हा प्रकार १५ फेब्रुवारी ते २४ एप्रिल २०२१ दरम्यान घडला. याबाबत मुलीच्या आईने महाड एमआयडीसी ठाण्यात राजेंद्र विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या तरुणावर बलात्कार, लैंगिक शोषण अणि पोक्सो कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राजेंद्र याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07642 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top