पूरग्रस्त कांबळे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्त कांबळे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा
पूरग्रस्त कांबळे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

पूरग्रस्त कांबळे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

महाड, ता. ४ (बातमीदार) : गतवर्षी २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यासह बिरवाडीमधील अनेक दुकानांचे नुकसान झाले होते. अशा दुकानदारांना ५० हजारांची सरकारी मदत देण्यात आली; परंतु बिरवाडी येथे असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचे मालक मयूर कांबळे यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने कांबळे यांनी गुरुवारपासून (ता. ५) कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे.
मयूर कांबळे यांचे बिरवाडी येथे नक्षत्र कॉम्प्लेक्स गाळा नंबर ८ मध्ये एम. के. इन्फोटेक या नावाने आपले सरकार सेवा केंद्र आहे. गतवर्षी महापुरात बिरवाडी गावात पुराचे पाणी शिरले होते. त्यामध्ये त्‍यांच्या केंद्रामध्येही पाणी शिरले होते. यात लॅपटॉप, फर्निचर, स्टेशनरी आदींचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा रीतसर पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आला होता; परंतु सरकारने जाहीर केलेली मदत त्यांना मिळाली नाही. खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये हा मुद्दा मयूर कांबळे यांनी बिरवाडी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून मांडला. तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनाही त्‍यांनी पत्र देऊन मदतनिधी मिळावा, यासाठी विनंती केली. त्याअनुषंगाने मंत्रालयातून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबतचा अहवाल मागितला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने महाडचे उपविभागीय अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले असून, त्याच्या अहवालाची प्रत सादर करण्यात सांगितले आहे. याला दोन महिने उलटले तरी कोणतीही हालचाल नाही. परिणामी, मदतनिधी मिळायला उशीर होत असल्याने नाईलाजास्तव उपोषणाला बसण्याचा निर्णय कांबळे यांनी घेतल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07659 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top