वडघरमध्ये पाचदिवसीय अभिव्यक्ती शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडघरमध्ये पाचदिवसीय अभिव्यक्ती शिबिर
वडघरमध्ये पाचदिवसीय अभिव्यक्ती शिबिर

वडघरमध्ये पाचदिवसीय अभिव्यक्ती शिबिर

sakal_logo
By

महाड, ता. ४ (बातमीदार) : अभ्यासाचा ताण, नोकरदार पालकांमुळे येणारे एकाकीपण, विविध स्पर्धा या सगळ्यातून मुलांनाही जावे लागते. याचा परिणाम त्यांच्या वाढीवर होत असतो. योग्य वयात आवश्यक संस्कार, कला माहिती व स्वयंशिस्तीचा, नवे अनुभव आणि धम्माल गाणी आणि खेळातून मिळणारा निखळ आनंद यातून अभिव्यक्त होण्याची संधी वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात १० ते १३ वयोगटातील मुलांना मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे स्मारकात १५ ते १९ मे या कालावधीत पाचदिवसीय अभिव्यक्ती शिबिर होणार आहे.
कुमारवयीन मुला-मुलींना अभिव्यक्त होण्याची संधी देण्यासाठी आणि सुट्टीची धम्माल करताना नवीन अनुभव, ज्ञान मिळवण्यासाठी माणगावजवळ वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या ३६ एकरच्या निसर्गसंपन्न परिसरातील कायमस्वरूपी कॅम्प साईटवर हे निवासी शिबिर आहे. यात केवळ ५० मुलांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. शिबिरात चाकावरील मातीकाम, पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, चित्रकला, ओरिगामी, कोलाज, वैज्ञानिक खेळणी, ट्रेकिंग, झुमरिंग, स्लॅक लाईन, ट्रेजर हंट, अंधारातील थरार, नाटक, बैलगाडी सफर, श्रमदान, नेचर ट्रेल, धम्माल गाणी आणि खेळ, योग, एरोबिक्स, डॉक्युमेंट्री आणि कॅम्प फायर असे सरस उपक्रम आहेत. मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था असून संवादासाठी व राहण्यासाठी ताई-दादा आहेत. शाकाहारी जेवण, वैद्यकीय सुविधा आणि प्रत्येक सत्रासाठी वेगवेगळे मान्यवर मार्गदर्शक अशी मेजवानीही आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये दरवर्षी जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांची शिबिरे होत असतात. त्यातीलच सर्व लहानग्यांमध्ये फेमस असलेले हे अभिव्यक्ती शिबिर होय. शिबिरासाठी नोंदणी सुरू असून इच्छुकांनी ७७७६९३७८४४ आणि ८८७९०९४८६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07660 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top