गुंगीचे औषध देऊन बैलाची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंगीचे औषध देऊन बैलाची कत्तल
गुंगीचे औषध देऊन बैलाची कत्तल

गुंगीचे औषध देऊन बैलाची कत्तल

sakal_logo
By

महाड, ता. ४ (बातमीदार) : दोन बैलांना गुंगीचे औषध देऊन त्यातील एकाची मांसासाठी कत्तल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना महाड तालुक्यातील आंग्रेकोंड गावी २ ते ३ मे दरम्यान घडली. अशा प्रकारे जनावरांची कत्तल करण्याची गेल्या काही दिवसांतील तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. आंग्रेकोंड येथील रामचंद्र तुकाराम आंग्रे हे २ मे रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या दोन बैलांना गोठ्यात बांधून गोठ्याला कुलूप लावून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ते गोठ्यात गेले असता गोठ्याचे कुलूप तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आत प्रवेश करून पाहिले असता एक बैल बेशुद्धावस्थेत असल्याचे आणि एक बैल गोठ्यातून गायब झाल्याचे त्यांना दिसले. या वेळी आंग्रे यांनी आजूबाजूला शोध घेतला असता जवळच असलेल्या एका जागेमध्ये एक बैल मारून त्याचा कोथळा काढून बैलाचे मांस चोरून नेले असल्याचे दिसून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07661 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top